विशेष प्रतिनिधी
लखनऊ : Yogi Adityanath मौलाना विसरलेत सत्तेत कोण आहे? सात पिढ्या लक्षात ठेवतील असा धडा शिकवू असा इशारा बरेली हिंसाचारावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.Yogi Adityanath
उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडलेल्या “I Love Muhammad” हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ‘एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, राज्यात दंगल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना असा धडा शिकवला जाईल की त्यांच्या पिढ्यांनाही तो विसरता येणार नाही.Yogi Adityanath
योगी म्हणाले, “बरेलीमध्ये मौलवी विसरले की सत्तेत कोण आहे. त्याने नाकेबंदीचा इशारा दिला होता. आम्ही ठामपणे सांगितले, ना नाकेबंदी होईल, ना कर्फ्यू लागेल. अशांना असा धडा शिकवला जाईल की त्यांची भावी पिढीही दंगल करण्याचा विचार करणार नाही.”
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (IMC) चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास 40 जणांना अटक झाली असून सुमारे 2,000 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मौलाना रझा यांनी शुक्रवारी नमाजानंतर आंदोलनाचे आवाहन केले होते. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही गर्दी जमली आणि हिंसाचार भडकला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, गाड्या आणि दुकाने फोडली. अनेक व्हिडिओंमध्ये आंदोलकांनी “अल्लाहू अकबर”च्या घोषणांसह पोलिसांवर हल्ला करताना दिसले. काही लहान मुलेदेखील या जमावात सहभागी असल्याचे समोर आले.
पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. शहरातील खलील स्कूल चौकाजवळ मोठ्या प्रमाणावर दुकाने, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. हिंसाचारानंतर मौलाना रझा यांना आधी घरात नजरकैदेत ठेवण्यात आले, त्यानंतर पहाटे त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना सिटापूर जेलमध्ये हलविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगी यांनी आठवण करून दिली की 2017 पासून त्यांच्या सरकारने प्रत्येक दंगलखोराला त्यांच्या भाषेत उत्तर दिले आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत सरकार ठाम असून राज्याच्या विकासकथेचा पाया शांतता आणि सुरक्षिततेवर उभा आहे.
Yogi Adityanath warns on Bareilly violence
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…




















