वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Owaisi तुम्ही जर आमच्या देशात घुसून निष्पाप लोकांना मारणार असाल तर देश शांत बसणार नाही. आमच्याच माणसांना धर्माच्या आधारावर मारणार असाल तर तुम्हाला धर्माबाबत बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही इसिससारखे वागला आहात, असा हल्लाबोल ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर केला आहे.Owaisi
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करावी, यासाठी देशातील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. ओवैसी यांनीही स्पष्ट केले आहे की, सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ.
माध्यमांशी संवाद साधताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, सत्ताधारी भाजपा प्रत्येकवेळी म्हणते, घरात घुसून मारू. पण आता केंद्र सरकार पाकिस्तानवर कारवाई करणार असेल, तर त्यांनी घरात घुसून बसावे. भारताच्या संसदेने ठराव करून पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे म्हटले होते. जर पाकव्याप्त काश्मीर आपलेच घर असेल तर ते ताब्यात घेतले पाहिजे. कारण पाकिस्तानी सैन्य चौकीवरून पळून गेल्याचे समजते, त्यामुळे भारताने आता तिथे जाऊन बसले पाहिजे. कारण दहशतवाद्यांनी यापूर्वी मुंबई, पुलवामा, उरी, पठाणकोट आणि रियासी याठिकाणी हल्ले केले आहेत. आता पहलगाम येथे हल्ला केल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी दहशतवाद संपवण्यासाठी केंद्र सरकारला एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता दहशतवाद संपुष्टात आणावा, अशी
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पाकिस्तान अनेकदा दावा करतो की, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, निष्पाप लोकांना मारणार असाल तर देश गप्प बसणार नाही.
You are behaving like ISIS, Owaisi attacks Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती