विशेष प्रतिनिधी
सांगली: जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार विक्रमसिंह सावंत हरले नाहीत तर मतचोरीच्या माध्यमातून हरवण्यात आले, असा दावा काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. 500 मतदार असलेल्या गावात 1500 मतदान झाले. आपण गाफिल राहिलो. कुठूनही माणसे आली आणि मतदान करून गेली, असा आरोप पाटील यांनी केला.
जत विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर व काँग्रेस उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्यात थेट लढत झाली होती. त्यात पडळकर यांनी सावंत यांचा 37 हजार 881 मतांनी पराभव केला होता. जत हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. याबाबत पाटील म्हणाले, जो माणूस 5 पिढ्यांपासून जत मतदारसंघातील रहिवाशी आहे, त्याची जात, धर्म पाहून त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यानंतर जो व्यक्ती मतदारसंघातील रहिवासी नाही त्याचे नाव मतदार यादीत टाकण्यात आले. असे अनेक प्रकार समोर आलेत.
ज्या गावात केवळ 500 मतदार आहेत, त्या गावात तब्बल 1500 मतदान झाले. आपण गाफिल राहिलो. त्यामुळे कुठूनही माणसे आली आणि मतदान करून गेली. आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर लोकशाहीची मूल्ये धोक्यात सापडल्याची स्पष्ट जाणिव होते. एकीकडे विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल सुरू आहे, तर दुसरीकडे दडपशाही व कटकारस्थानांचा खेळ सुरू आहे. खासदार राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा समोर आणून या सरकारला उघडे पाडले आहे. संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकारही या हुकूमशाही सरकारने आपल्यापासून हिरावून घेतला. हे सरकार मतांची चोरी करून खुलेआमपणे सत्ते आले आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने या प्रकरणी सजग राहून वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.
काँग्रेस आमदार विश्वजित कदम म्हणाले, सध्या काँग्रेस पक्षासाठी आव्हानकारक काळ आहे. पण अशा काळातच संघटनेची खरी ताकद स्पष्ट होते. काँग्रेसच्या विचारधारेचा पाया लोकशाही, समानता व न्यायावर आधारित आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत व विश्वासार्हता जपणारा असून, तो युवापिढीला भावणारा आहे. फक्त आता हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. संघटनेतून नवे नेतृत्व तयार करण्याची, संघटना बळकट करण्याची व पक्षाचा झेंडा अधिक उंच करण्याची हीच योग्य वेळ आहे.
1500 votes in a village with 500 voters, alleges MP Vishal Patil
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा