विशेष प्रतिनिधी
पुणे : municipal elections स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सध्या पुण्यातही जोरात सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता महापालिका निवडणूका जानेवारी अखेरीस पार पडणार आहेत.
जानेवारीमध्ये होणाऱ्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी नागरी प्रशासनामार्फत सुमारे २४,००० कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे. महापालिकेची निवडणूक ही नव्याने तयार केलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे. ज्यामध्ये विद्यमान शहर हद्दीसह ३२ विलीन गावे देखील समाविष्ट आहेत. निवडणुकीतील ४१ प्रभाग रचनेबाबतची अंतिम अधिसूचना ६ ऑक्टोबरपर्यंत येणे अपेक्षित आहे. या अधिसूचनेनंतर १६५ नगरसेवकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. municipal elections
निवडणुकीदारम्यान होणाऱ्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी, प्रशासनाने आधीच १९,००० कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केलेली आहे. तसेच उर्वरित पदे भरण्यासाठी प्रशासन विविध सरकारी विभागांशी देखील समन्वय साधत आहे. कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त या संपूर्ण कामकाजावर देखरेख करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सुमारे १७ निवडणूक अधिकारी आणि तितक्याच संख्येने सहाय्यक अधिकाऱ्यांची देखील मागणी करण्यात आली आहे.
अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या ३,४३१ इतकी होती. मात्र आता मोठ्या संख्येने नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. यामुळेच, मतदार केंद्रांची संख्या आता वाढून सुमारे ४,४९० होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी काही केंद्रांचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला आहे. municipal elections
या प्रस्तावित केंद्रांची तपासणी करण्यासाठी तसेच अंतिम मंजुरीपूर्वी अहवाल सादर करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या वाढत्या शहराच्या हद्दी आणि मतदारांची वाढती संख्या पाहता, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्व सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान विविध कर्तव्ये सोपविण्याची प्रशासनाची योजना आहे. municipal elections
24,000 new employees to be deployed in Pune in the wake of municipal elections
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!