Devendra Fadnavis : लवकरच परिवहन विभागाच्या 45 सेवादेखील आता व्हॉट्सअपवर!

Devendra Fadnavis : लवकरच परिवहन विभागाच्या 45 सेवादेखील आता व्हॉट्सअपवर!

Devendra Fadnavis

प्रदूषणमुक्तीसाठी राज्य शासनाने 18 हजार सरकारी वाहने भंगारात काढण्याचा घेतला निर्णय


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, मुंबई येथे रविवारी परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.Devendra Fadnavis

85 वर्षांनंतर परिवहन विभागाला अतिशय सुंदर मुख्यालयाची इमारत मिळत असल्याचा आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस  ( Devendra Fadnavis ) म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे. यामुळे विविध विभागांच्या 500 अधिसूचित सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आता यामध्ये परिवहन विभागाच्या 45 सेवांचादेखील समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अपघातांची संख्या कमी होण्यामध्ये तंत्रज्ञानाचा, आधुनिक व्यवस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे. नियम मोडला तर कॅमेऱ्याद्वारे नोंद होऊन दंडाची पावती घरी पाठवली जाते, हे लक्षात आल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी आपल्याकडील पार्किंग जागांचे मॅपिंग करावे आणि ते एका ऍपवर आणावे. पार्किंग नसेल तर गाडी घेता येणार नाही असे न होता, पार्किंगची जागा आमच्या ऍपवरुन भाड्याने घ्या आणि नंतर गाडी घ्या, अशी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने पावले उचलायला हवीत. यामुळे गाड्यांचे पार्किंग, वाहतूक कोंडी, अपघातापासून रस्ते मुक्त होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

प्रदूषणमुक्तीसाठी राज्य शासनाने 18 हजार सरकारी वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनाअडथळा मालवाहतूक होत नाही, तोपर्यंत ईज ऑफ डुईंग बिझनेस होणार नाही, सप्लाय चेन तयार होणार नाही, उद्योग वाढणार नाही. यामुळे केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे आणि 100 दिवसांच्या कार्यक्रमाप्रमाणे परिवहन विभागाने 15 एप्रिलपर्यंत राज्यातील चेक नाके बंद करण्याचा प्रस्ताव तयार करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार मनिषा कायंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

45 services of the Transport Department will also be available on WhatsApp

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023