विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रासारख्या सुजलाम सुफलाम आणि पराक्रमी राज्याला ड्रग्ज फ्री करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. देवाभाऊंच्या प्रयत्नांना आपणही बळ देण्याची गरज आहे. देवाभाऊंना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून ६०० विद्यार्थी-विद्यार्थीनींनी ‘नो डग्ज’ची प्रतिज्ञा केली.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
नागपूर येथील शंकरनगरातील सरस्वती विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच शाळेत आपले सातवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, हे येथे उल्लेखनीय !ब्रिटीश कालावधीत आकाराला आलेले हे ‘विद्येचे मंदीर’ सुमारे १३० वर्षे जुने आहे. प्रारंभी या शाळेला मद्रासी शाळा म्हणून ओळखले जायचे.
आज घडीला शाळेत ३ हजारांच्या घरात मुले आणि मुली शिक्षणासोबतच संस्काराचे धडे गिरवितात. आपल्या याच विद्यामंदीरात शिकलेले ‘देवा भाऊ’ राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना वाढदिवसाचे एक आदर्श गिफ्ट देऊ असा संकल्प ‘विद्या मंदीरा’ने आधीच केला होता. त्याला हातभार लावला नशाबंदी मंडळाने. त्यानुसार आज सकाळी सरस्वती विद्यालयात संस्थेच्या प्रमूख पुष्पा अनंत नारायण, एएचएम लक्ष्मी श्रीनिवासन, पर्यवेक्षक रवींद्र कुळकर्णी, राहुल घोडे यांनी नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक गाैरव आळणे, ताराचंद पखिड्डे आणि सहकाऱ्यांनी विद्यार्थी विद्यार्थीनींना शिक्षण, संस्कार अन् आदर्श यांची सांगड व्यक्तीला यशाच्या शिखरावर कशी पोहचवते, त्याबाबत छोटेखानी मार्गदर्शन केले. व्यसनामुळे समाज अधोगतीला जात आहे, तरुणाई उध्वस्त होत असून रक्ताचे नाते व्यसनामुळे विकृतीकडे वळत असल्याची उदाहरणे यावेळी विद्यार्थ्यांसमोर ठेवली.
600 students pledge ‘No Dogs’ as a birthday gift to Devabhau
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैस