विशेष प्रतिनिधी
पाेर्टब्लेअर : अंदमान येथील सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भव्य स्मारक व्हावे, असा महाराष्ट्र शासनाचा दृढ निर्णय असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितली.
आशिष शेलार सध्या अंदमान-निकोबार दौऱ्यावर असून, त्यांनी सेल्युलर जेलला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी सावरकर यांना ज्या काळकोठडीत ठेवण्यात आले होते, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होत त्यांच्या त्यागाला अभिवादन केले. या दौऱ्याच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत त्यांनी सावरकर स्मारकाच्या उभारणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली. स्मारकाच्या निर्मितीमुळे भावी पिढ्यांना सावरकरांच्या कार्याची आणि त्यागाची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अंदमान-निकोबारचे मुख्य सचिव डॉ. चंद्र भूषण कुमार यांची त्यांनी भेट घेतली.
शेलार म्हणाले, ज्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी देशासाठी कठोर कारावास भोगला, त्या पवित्र भूमीचा आणि अंदमान-निकोबार बेटांचा महाराष्ट्रातील सावरकर प्रेमींशी भावनिक संबंध आहे. या परिसराशी संबंधित असंख्य आठवणी आणि भावना महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयाशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणी सावरकरांचे भव्य आणि योग्य स्मारक उभारावे, अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे.
आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्र शसानाने जी स्मारकाची संकल्पना मांडली आहे, त्या प्रस्तावात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारकांच्या कार्याचे चित्रण करणारे भव्य पुतळे, शिल्पफलक, डिजिटल संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची संकल्पना आहे. महाराष्ट्र सरकार या स्मारकाच्या उभारणीत पूर्णपणे कटिबद्ध असून, स्थानिक प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्यास हे स्मारक उभे राहू शकेल.
या प्रस्तावाबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंतीपत्र पाठवून महाराष्ट्र शासनाची मागणी केंद्र सरकारकडे मांडलेली आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासनाला महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि स्मारकासंदर्भातील संकल्पना अधिक स्पष्टपणे समजावून सांगण्यासाठी आज शेलार यांनी अंदमान-निकोबारचे मुख्य सचिव डॉ. चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली.
A grand memorial to Veer Savarkar in the Cellular Jail premises, Cultural Affairs Minister Ashish Shelar expressed determination
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?