विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला करण्यात आला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. मात्र आता पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल याला नेपाळमधून अटक केली आहे. जो भारतातील सर्वात मोठा बेकायदेशीर शस्र पुरवठादार आहे. Baba Siddiqui
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सलीम पिस्टल याचे नाव समोर आले होते. सलीम हा दिल्लीच्या सीलमपूर भागातील रहिवासी आहे. महत्त्वाचे म्हणजे सलीम पिस्टल याला 2018 मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली होती, परंतु नंतर तो परदेशात पळून गेला होता. अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला सलीम नेपाळमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने आणि भारतीय सुरक्षा एजन्सीने संयुक्त कारवाई करत सलीम पिस्टल याला अटक केली आहे.
दरम्यान, सलीम पिस्टल हा गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमधून भारतात अत्याधुनिक शस्रे पुरवत होता. सुरक्षा यंत्रणांना असेही पुरावे सापडले आहेत की, सलीमचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंध आहेत. तपासात असेही समोर आले की, सलीम हा लॉरेन्स बिष्णोई आणि हाशिम बाबा सारख्या कुख्यात गुंड टोळींना देखील हत्यारे पुरवत होता. तसेच सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील एका आरोपीचा तो गुरु देखील असल्याचे तपासात समोर आले आहे.
सलीम शेख उर्फ सलीम पिस्टल याने 2000 मध्ये त्याचा साथीदार मुकेश गुप्ता उर्फ काका याच्यासोबत गाड्या चोरण्यास सुरुवात केली होती. सलीमने 7 एप्रिल 2000 रोजी चांदणी चौकातून एक मारुती व्हॅन चोरली होती. याप्रकरणी त्याला 25 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर सलीम पिस्टलने 7 ऑगस्ट 2011 रोजी त्याने 20 लाख रुपयांचा दरोडा टाकला होता. या प्रकरणात, 18 सप्टेंबर 2013 रोजी त्याला अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. दरम्यान, आता सलीम पिस्तूलची अटक ही सुरक्षा यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे. भारतातील बेकायदेशीर शस्र पुरवठा प्रकरणी ही मोठी कारवाई आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आरोपींशी संबंधित प्रत्येक पैलूची कसून चौकशी करत आहेत.
Accused in former minister Baba Siddiqui murder case arrested from Nepal
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!