Bhai Jagtap भाई जगताप यांच्यावर होणार कारवाई? निवडणूक आयोगाला म्हणाले कुत्रा

Bhai Jagtap भाई जगताप यांच्यावर होणार कारवाई? निवडणूक आयोगाला म्हणाले कुत्रा

Bhai Jagtap

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेस नेते भाई जगताप यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना श्वानाची उपमा दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘आपली लोकशाही इतकी मोठी आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे जर लोकशाहीवर काही प्रश्न उपस्थित होत असतील, काही शंका असतील तर त्याचं उत्तर हे निवडणूक आयोगाला आणि सरकारला द्यावंच लागेल. निवडणूक आयोग श्वान आहे. जेवढ्या काही संस्था आहेत या सर्व संस्था श्वान होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसल्या आहेत. ज्या संस्था आपल्या लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्याचं असं वागत आहेत’ असं वक्तव्य जगताप यांनी केलं होतं.


Imtiaz Jalil ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा


जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोग हा घटनात्मक अधिकार आहे. भाई जगताप यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केली. असे वक्तव्य केल्याप्रकरणी जगताप यांनी माफी मागितली पाहिजे. तर जगतापांचं बोलणं हे वाचाळवीरांसारखं आहे . तेच भुंकताना दिसत आहेत असे टीकास्त्र प्रवीण दरेकर यांनी सोडले आहे.

भाई जगताप म्हणाले की, मी अजिबात माफी मागणार नाही, अगदी एकदाही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांच्या दबावाखाली आयोग काम करत असेल, तर मी जे बोललो ते बरोबर आहे. मी माफी मागणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. निवडणूक आयोग देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी असतो, कोणाचीही सेवा करण्यासाठी नाही. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. टी.एन. शेषन यांनी केलं तसं काम निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे.

Action will be taken against Bhai Jagtap? Said the dog to the Election Commission

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023