विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditi Tatkare पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. मात्र निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले .Aditi Tatkare
पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने जवळपास 4000 लाडक्या बहिणींची पडताळणीपूर्वीच माघार घेतली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये जोरदार चर्चेत असलेली लाडकी बहीण योजने’च्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला स्वतःहून पुढे येत आहेत. राज्यभरातून आतापर्यंत अनेक लाभार्थी महिलांनी स्वतःहून या योजनेचे पैसे परत करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मात्र दिलेले पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसला तरी यापुढच्या काळात निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे, अशी माहिती समोर आली.
Aditi Tatkare clarified that there is no intention to take money back from Ladki Bahin
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis उज्वल निकम यांच्या नियुक्तीत राजकारण करणे गुन्हेगारांना मदत करण्यासारखे, देवेंद्र फडणवीस यांची खंत
- Yogesh Kadam पुण्यातील सिग्नलची व्यवस्था स्मार्ट सिटीकडून पुणे पोलिसांकडे, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन
- Bhaskar Jadhav : भास्कर जाधव उध्दव ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत
- Nitin Gadkari : साखर उद्योगाला नितीन गडकरी यांच्या या निर्णयामुळे मिळणार नवसंजीवनी, आयातीवरचा खर्चही कमी होणार