विशेष प्रतिनिधी
मुंबई : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक यांचेही निधन झाले. वाहिनी अपर्णा महाडिक यांच्या आठवणी जागवत मंत्री आदिती तटकरे यांनी शोकाकुल कुटुंबाला आधार देणारी भावनिक पोस्ट लिहिली आहे. Aditi Tatkare
आदिती तटकरे यांनी म्हटले आहे कि , “अहमदाबाद येथील विनाशकारी विमान अपघातात निधन झालेली माझी वहिनी, एअर इंडियाच्या केबिन क्रू अपर्णा महाडिक यांच्या दुःखद निधनाबद्दल मी खूप दुःख व्यक्त करते. काही दिवसांपूर्वीच, आम्ही सगळे एकत्र हसत होतो, बोलत होतो, आनंदी क्षण साजसे करीत होतो. आयुष्य किती क्षणभंगुर आहे, त्यासाठी प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला हवा, असे आम्ही बोलत होतो. इतक्या लवकर, ते शब्द खरे ठरतील, असे आम्हाला वाटले नव्हते. या सगळ्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती”.
अपर्णा वहिनी त्यांच्या समर्पण, नम्रता आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखल्या जात. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबातील केवळ एक प्रिय सदस्यच नाही तर एक दृढनिश्चयी आणि स्वावलंबी महिला देखील हिरावून घेतली आहे.”
“आमच्या शोकाकुल कुटुंबातील आत्या आणि मामा (श्रीमती सुलभा आणि श्री. यशवंत महाडिक), माझा आत्येभाऊ अमोल महाडिक आणि लहान अमायरा आणि अपर्णा वहिनीची आई आणि बहीण, ज्यांचे खूप जास्त नुकसान झाले आहे, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
It is with deep sorrow that I share the tragic loss of my cousin sister-in-law, Aparna Mahadik, Cabin Crew Supervisor with Air India, who passed away in the devastating plane crash in Ahmedabad.
Just a few days ago, we were all together laughing, talking, sharing moments and we… pic.twitter.com/sM4cdKav7C
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) June 14, 2025
Aditi Tatkare recalls memories of Aparna vahini, who died in a plane crash
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी