विशेष प्रतिनिधी
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती जगाला सांगण्यासाठी शिष्टमंडळे पाठवली. मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ( बीसीसीआय) पाकिस्तानसोबत सामने खेळून पैसे कमवण्याची संधी गमावू शकत नाही, हा खोटा राष्ट्रवाद असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे Aditya Thackeray
बीसीसीआयचे निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषद घेत आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार, तर शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारत-पाकिस्तानच्या सामन्यांवरून ठाकरे गटाने भाजपला लक्ष्य केले आहे. Aditya Thackeray
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट करत #FakeNationalism असा हॅशटॅग वापरत बीसीसीआय आणि भाजपवर हल्ला चढवला आहे. ही पोस्ट करताना त्यांनी
या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले आहे की, एका बाजूला भाजप तुम्हाला सातत्याने “पाकिस्तानला जा” असे सांगते. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती जगाला सांगण्यासाठी शिष्टमंडळे पाठवू शकतात. मात्र दुसऱ्या बाजूला बीसीसीआय पाकिस्तानसोबत सामने खेळून पैसे कमवण्याची संधी गमावू शकत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
खासदार प्रियांका चतुर्वेदी भाजपवर हल्ला चढवताना
एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की आता भाजपचे चीअरलीडर्स भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईला जातील. जोपर्यंत बीसीसीआय या सामन्यातून पैसे कमवत राहील तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर विसरता येईल, लज्जास्पद.
.आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ सामने होऊ शकतात. पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.
Aditya Thackeray accuses BJP of fake nationalism
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला