विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदाेलकांना अन्न- पाण्यासाेबत आवश्यक मदत पाेहाेचविण्याच्या सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. दाेन दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे यांनीही मराठा आंदाेलकांना मदत करावी असे आवाहन केले हाेते. Amit Thackeray
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. राज्यभरातून हजारो मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. सुरुवातीला आंदोलनकर्त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
रोज मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या खाण्या पिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना त्यांना अन्न-पाणी पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमित ठाकरे यांनी एक्स पोस्टवरुन”माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल.
पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत. म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे. माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे, असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
After Thackeray Faction, MNS Steps In to Support Maratha Protesters; Amit Thackeray Orders Supply of Food and Water
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल