विशेष प्रतिनिधी
नाशिक : Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरुन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पोर्टल बंद केले असा गंभीर आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. हे पोर्टल जाणीवपुर्वक बंद ठेवले आहे यामुळे हजारो मराठा युवकांचे नुकसान झाले. अजित पवारांकडे काही मागितल तर त्यांना वाटते मी पैसे घेण्यासाठी आलो आहे. ते कायम चिडलेले असतात. मी त्यांच्याकडे जाणे टाळले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.Ajit Pawar
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेश पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मंत्री छगन भुजबळ महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सूचना करुंन पोर्टल बंद पाडतात. तसेच, दुर्भाग्य हे आहे की, सरकार मध्ये समतोल नाहीये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार होत आहे. पोर्टल बंद पडल्याने 15 हजार मराठा तरुणांना लाभ घेता आला नाही. भुजबळ यांनी वेगवेगळ्या आंदोलनात महामंडळाचा उल्लेख केला आहे. अजित पवार यांच्या अधिपत्याखाली महामंडळ येते त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून हे सर्व नियोजन केले गेले आहे. याबाबत विभागाकडून महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सूचना आल्या असतील, कोणतेही सॉफ्टवेअर 12 ते 24 तास बंद राहते पण 1 महिन्यापासून सॉफ्टवेअर बंद असल्याने सरकार यामध्ये अडथळे निर्माण करत आहे.Ajit Pawar
नरेंद्र पाटील म्हणाले, या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. मुख्यमंत्र्यांना देखील मेसेज केला होता. हे खाते अजित पवार यांच्या अधिपत्याखाली येत असल्याने दुसरा कोणी यात ढवळाढवळ करू शकत नाही. त्यामुळेच वेबसाईट सुरू करण्यासाठी महामंडळाचे एमडी पुढाकार घेत नाहीत. प्रशासकीय अधिकारी आपला रंग दाखवत आहेत. सोमवार नंतर या अधिकाऱ्यांची गडचिरोली सारख्या ठिकाणी बदली करावी ही विनंती. असे ते म्हणाले. मराठा समाज व्यवसायाच्या माध्यमातून पायावर उभा राहातो, व्यवसाय करतो हे डोळ्यात खुपत आहे. म्हणूनच हा प्रकार घडत आहे अस ते म्हणाले.
त्यामुळे विखे पाटील यांच्याकडे गेलो. उद्या मंगळवारी मराठा समाजाचे समन्वयक राधाकृष्ण विखे पाटलांना भेटणार आहेत. त्यानंतर तोडगा निघेल. 300 कोटी ते 350 कोटी रुपये बँकेत ठेवले जातात, त्याचा फायदा अधिकाऱ्यांना होतो का? लाभार्थ्यांना व्याज परतावा देण्यापेक्षा बँकेत पैसे ठेवल्याने अधिकाऱ्यांना याचा फायदा होतो का? असा मला संशय येतो त्यामुळे या सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे.असे ते म्हणाले. विजय सिंह देशमुख सातारचे आहेत मानखटाव चे आहेत, सुरवातीला चांगले अधिकारी वाटले. नंतर त्यानी त्यांचा रंग दाखवला आणि पोर्टल बंद केले. पोर्टल बंद पडण्याचे कट कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या सूचनेनुसार झाले आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.
Ajit Pawar Acting on Bhujbal’s Advice Has Harmed Maratha Youth, Says Narendra Patil
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले


















