विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात काही टीव्ही अँकरकडून आपली निष्कारण बदनामी करत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. या प्रकरणात माझा काय संबंध असा सवालही त्यांनी केला.
पुणे पोलिसांनी 23 वर्षीय वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे या दोघांनाही शुक्रवारी (23 मे) पहाटे अटक केली. अजित पवार यांनी हगवणे कुटुंबावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही माध्यमांसमोर केली आहे.
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या व्हायरल व्हिडीओबद्दल विचारण्यात आले. मालेगावमधील एका सभेत अजित पवार यांनी ‘आता मी कोणत्याच लग्नाला जाणार नाही,’ असे म्हणत हास्यविनोद केला होता. पण, गंभीर बाब असताना या व्हिडीओने अजित पवारांवर टीका करण्यात येत होती. यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, “मी भाषणात म्हणालो होतो की, माध्यमांमधील लोकं मी लग्नाला गेल्याचे फोटो दाखवत होते. मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो, आणि फोटो काढला. त्यानंतर काही वेगळे घडले त्यात माझा काय दोष?” मी तिथे लोकांना असे म्हंटले की, जर माझ्यावर असे आरोप करण्यात येत असतील तर मी कोणाच्या लग्नाला जाणारच नाही. असे म्हटल्यानंतर समोरची लोकं हसली, त्यात माझा काय दोष? जर माझा दोष नाही तर मला का दोषी ठरवता?”
पवार म्हणाले की, “कस्पटे कुटुंबाला विचारले का? अजित पवार कोणत्या विचारांचे आहेत? वैष्णवीचे वडील माझ्याशी बोलले आहेत. तुम्हाला काय अजित पवारांशिवाय उद्योग नाही. माझा कुठेही संबध नसताना माझे नाव जोडले जाते, मी अशाप्रकारचे कृत्य करायला सांगितले होते का?” दुर्दैवाने विविध माध्यमांमध्ये काही जणांनी माझ्या नावाची बदनामी केली आहे, माझा त्यात दुरान्वयेही संबंध नाही. पहिल्या दिवसापासून कडक कारवाई करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. अटक झालेल्या दोघांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. Ajit Pawar
Ajit Pawar alleges unjustified defamation by some TV anchors in Vaishnavi Hagawane suicide case
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर