विशेष प्रतिनिधी
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारी वाचविण्याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, अशा शब्दांत त्यांना सुनावले होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली होती. अजित पवार जनाची नाही तर मनाची तर ठेवा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी इथेनॉल धोरण लागू करून कारखान्याला जीवदान दिले त्यांचे कारखान्याच्या सभेत अभिनंदनाचे बॅनर फोटो तरी लावा, असे ते म्हणाले होते.
यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, विखे पाटलांचा गैरसमज झाला आहे, मी स्वतः कबूल करतो की इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोल मध्ये मिक्स करायला परवानगीचे बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळे कारखानदारीला चांगली मदत झाली, याचे सगळे श्रेय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. विखे पाटलांना काहातरी गैरसमज झाला आहे. मी त्यांच्यासोबत बोलेन.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री विखे पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला. मिटकरी म्हणाले, भाजपचे वरिष्ठ नेते आपली दखल घेतीलच, पण उगाच खेटे घेऊ नका #राधेकृष्ण, असा टोलाही मिटकरींनी लगावला होता.
Ajit Pawar credits Modi-Shah for saving sugar industry in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari : आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय, अमाेल मिटकरींचा राधाकृष्ण विखे- पाटील यांना धमकीवजा इशारा
- Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर
- मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात, आमदार परिणय फुके यांचा हल्लाबाेल
- cabinet meeting : राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय