विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अजित पवार गटाला माेठा धक्का बसला आहे. दाेन विद्यमान आमदारांनी पवारांच्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे. फलटणमध्ये विद्यमान आमदार दीपक चव्हाण तर गंगापूर खुलताबादमध्ये विधान परिषदेचे विद्यमानआमादर सतीश चव्हाण लढणार आहेत. Ajit Pawar Faces Major Setback as Two Sitting MLAs Join Sharad Pawar’s Party
गंगापूर मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब तर महायुतीत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांनी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला हाेता.. सलग तिसऱ्यांदा विधानसभा काबीज करणारे आमदार प्रशांत बंब यांची भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी राहिली. त्यामुळे सतीश चव्हाण अपक्ष म्हणून लढणार की, महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार या संदर्भातही चर्चा सुरू हाेती. आमदार सतीश चव्हाण यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांकडून तीव्र विरोध होत हाेता. महाविकास आघाडीतील कुठल्याही निष्ठावान नेत्याला उमेदवारी द्यावी त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू असं पत्रकार परिषदेतून त्यांनी जाहीर केल आहे. Ajit Pawar
महाविकास आघाडी कडून शिवसेना पक्षातर्फे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष देवयानीताई डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून डॉ.ज्ञानेश्वर निळ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे पुत्र जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन किरण पाटील डोणगावकर यांची दावेदारी हाेती. मात्र, या सगळ्या निष्ठावंतांना डावलून शरद पवारांनी सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. Ajit Pawar
आमदार प्रशांत बंब यांनी मतदारसंघात जनसंपर्कासाठी जोरदार मुसंडी मारली असून कार्यकर्त्यांचे वेगवेगळे मेळावे, मतदारांच्या तीर्थक्षेत्रावरील भेटी, वैयक्तिक लाभाच्या योजना, स्नेह मिलन आणि आर्केस्ट्राच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत असून यासंदर्भात सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल जोरदार टीका-टिप्पणी केली जात आहे. बंब यांना पुन्हा विजयासाठी विकास कामासोबत आपलं राजकीय कौशल्य पणाला लावावे लागेल. Ajit Pawar
सतीश चव्हाण यांनी मात्र मागील दोन वर्षात विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. चाणाक्षपणाने अजित दादा सोबत जाऊन त्यांनी भरघोस निधी खेचून आणला. त्या माध्यमातून गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात कार्यकर्त्याची फळी उभी करायचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडीच्या स्थानिक निष्ठावान नेत्यांकडून त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध हाेती. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून तिरंगी लढत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात झाल्यास ही निवडणूक आमदार प्रशांत बंब यांना सोपी जाईल असेही बोलले जात हाेते, परंतु त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे.
फलटण मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनीही पवार गटाकडून उमेदवारी घेतली आहे. ही जागा अनुसुचित जातींसाठी राखीव आहे. त्यांना अजित पवार गटाकडून पहिल्याच यादीत उमेदवारी मिळाली हाेती. मात्र, फलटणचे नेते माजी मंत्री आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाइक- निंबाळकर यांनी शरद पवार यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे निष्ठावान असलेले चव्हाणही शरद पवारांकडे गेले.
Ajit Pawar Faces Major Setback as Two Sitting MLAs Join Sharad Pawar’s Party
महत्वाच्या बातम्या
- Nura Kushti माहीममध्ये नुरा कुस्ती की शिंदेंचा शिलेदार राज ठाकरेंच्या लेकाला झुंजविणार
- Uddhav Thackeray उध्दव ठाकरेंनी वाढवले महाविकास आघाडी टेन्शन, सांगोल्यातून दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर
- Shiv Sena शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर, बहुतांश विद्यमान आमदार
- Amit Thackeray : मनसेचे ठरले, अमित ठाकरे माहीम मधून लढणार, खडकवासल्यात मयुरेश वांजळे