विशेष प्रतिनिधी
बारामती : Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. जवळपास तासभर चाललेल्या या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.Ajit Pawar
अजित पवार यांनी स्पष्ट केले की ही भेट माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात झाली होती. त्यांनी सांगितले, “शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत. त्या मंडळात माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन हा वाईस चेअरमन म्हणून येतो. त्यामुळे निवडणुकीनंतर झालेल्या या बैठकीसाठी मी आलो होतो.”Ajit Pawar
यावेळी त्यांनी मंडळाच्या विश्वस्तांची निवड, वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ निश्चित करणे तसेच अॅडमिशन संदर्भातील मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे सांगितले.Ajit Pawar
पूरग्रस्तांच्या मदतीबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, “सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. मोठ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविल्या जात आहेत.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही नेत्यांच्या भेटी वेळोवेळी झाल्या आहेत, पण त्या बहुतेक वेळा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या होत्या. मात्र, ही भेट ठरवून झाल्याने राजकीय चर्चेला जोर आला आहे. त्यात आगामी महानगरपालिका आणि स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या भेटीचे अधिक महत्त्व वाढले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध भागांतील शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीचे प्रत्यक्ष परीक्षण केले असून तातडीच्या मदतीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Ajit Pawar meets Sharad Pawar, political excitement after hour-long discussion
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!