विशेष प्रतिनिधी
पुणे : माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर स्तुतीसुमने उधळली आहेत. भुजबळ यांनी स्पष्टपणे म्हटले की, “मुख्यमंत्री होणं हा देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क आहे, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांना ओबीसी नेतृत्वाच्या अपेक्षांबाबत विचारले असता, ओबीसी मुख्यमंत्री होण्यापेक्षा गोरगरीबांचे रक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, “भाजपचाच मुख्यमंत्री होईल, यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही वर्षांमध्ये जी मेहनत घेतली, ती उल्लेखनीय आहे. 2014 मध्येच ते मुख्यमंत्री व्हायला हवे होते, पण पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्या भूमिकेत त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि उत्कृष्ट कामगिरी केली.”
अजित पवार यांच्या संभाव्य मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांनी सकारात्मक मत व्यक्त केले. भुजबळ म्हणाले, “सध्या 132 आमदारांचे बहुमत असल्याने अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता आहे. तरीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तरी मला आनंदच होईल.”
ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपांवर बोलताना भुजबळ म्हणाले, “जर ईव्हीएममुळे आम्ही निवडणूक जिंकलो असतो, तर मला एक लाख मताधिक्य मिळायला हवे होते.
मात्र, माझे मताधिक्य कमी झाले.” याला कारणीभूत म्हणून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख केला.
भुजबळ म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या दिवशी गावोगावी फिरत जातीवाद पसरवण्याचे काम केले. याचा थेट फटका माझ्या मताधिक्यावर झाला.”
Ajit pawar name was taken but Chhagan Bhujbal clearly
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी सोडला मुख्यमंत्री पदावरचा दावा, देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा
- D. K. Shivakumar कर्नाटकात सिद्धरामय्या यांचे स्थान बळकट, डी. के. शिवकुमार वेटिंगवरच
- शरद पवारांचे राजकीय निवृत्तीचे संकेत ठरणार खरे!
- Sharad Pawar आता मागे हटायच नाही, लढायचं, शरद पवार म्हणाले ईव्हीएम विरोधात एकत्रित लढणार