विशेष प्रतिनिधी
मुंबई : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून आक्रमक झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या तीन आमदारांवर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच नाराज झाले आहेत. पालकमंत्री बदल करण्याची मागणी करण्यासाठी आलेल्या तीन आमदारांना मंत्रालयाच्या दारातून परत पाठवत अजित पवारांनी भेट नाकारली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. रायगडचं पालकमंत्रिपद तटकरे आणि गोगावलेंमध्ये विभागून देण्याची चाचपणी सुरु आहे. शिवसेना नेत्यांची पालकमंत्रिपदासाठी थेट अजित पवार यांची भेट घेतली. याच संदर्भात अजित पवार यांना भेटायला गेलेल्या तीन आमदारांना मंत्रालयाच्या दारातून परत यावे लागले आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे भरत गोगावले यांच्यात विभागुन देण्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रायगड आणि संपूर्ण कोकणात आपली ताकद असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळायला हवं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरेंना दिलं. पण शिवसेनेच्या विरोधामुळं अवघ्या काही तासांत पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याचा निर्णय घ्यावा लागला. प्रजासत्ताकदिनाचं ध्वजवंदन आदिती तटकरेंच्या हस्ते पार पडल्यानंतर आता शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंनी आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींसह अजितदादांची भेट घेतली. येत्या दोन दिवसांत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय होणार असल्याचं भारत गोगावलेंनी सांगितले आहे.
Ajit pawar refused a visit to three MLAs of Shinde over Raigad guardianship
महत्वाच्या बातम्या