विशेष प्रतिनिधी
अमरावती: महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच अमरावतीत आमदार रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद उफाळला आहे. खोडकेंनी एवढी गुर्मी व दादागिरी करू नये असा इशारा रवी राणा (Ravi Rana) यांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा व राष्ट्रवादीचे नेते आमदार संजय खोडके यांचं कट्टर राजकीय वैर सर्वश्रुत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीत पुन्हा राणा खोडके वाद उफाळला आहे.
रवी राणा म्हणाले, लोकसभेमध्ये संजय खोडके यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात काम केलं. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी मला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 50 फोन आले की खोडकेला मदत करा. मी थोडं जरी त्यांचा ऐकलं नसतं एक फेरफटका मारला असता तर खोडके यांना दहा हजार मतांनी पाडलं असतं. त्यामुळे त्यांनी एवढी गूर्मी करू नये दादागिरी करू नये.
संजय खोडके गेल्या तीन वेळा पराभूत झाले होते. यावरून त्यांना सुनावताना राणा म्हणाले, तीन तीन वेळा त्यांना पटकणी दिल्यानंतर सुधारणा झाली नाही. जे लोक नेहमी अहंकारांमध्ये राहतात त्यांचा अहंकार जनतेने चूर चूर केला आहे.
रवी राणा यांच्या वक्तव्यावर आमदार संजय खडके यांनी देखील पलटवार केला. रवी राणा मला नेहमीच धमकी देतात. निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की तीन वेळा पाडलं . त्यावेळी जनतेने मला नाकारलं याची मलाही काही खंत नाही. रवी राणामध्ये एवढी ताकद नाही की ते मला पाडू शकतात.
अजित पवार यांनी एकही फोन रवी राणाला केला नाही, उलट नवनीत राणाच्या प्रचाराला अमरावतीत अजित पवार आले होते तेव्हा रवी राणा यांनी म्हटलं अजित पवारांना की खोडकेला स्टेज वर बोलवा असा दावा संजय खोडके यांनी केला
विधानसभा निवडणुकीत मला रवी राणा यांना सोबत घेऊन माझी मतं खराब करायची नव्हती. रवी राणा ज्याच्यासोबत जाईल त्याचे मत खराब होत असते. रवी राणाचा पक्ष भाजपसोबत असेल तर आम्ही युती करणार नाही. कारण भाजप पक्ष रवी राणा चालवते असा हल्लाबोल संजय खोडके यांनी रवी राणा यांच्यावर केला.
Ajitdada’s 50 phones, otherwise the pranksters would have been beaten by 10 thousand, Ravi Rana attack
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका