विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. Maha Vikas Aghadi
विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य विषय निवडणूक आयोगाच्या कारभारात अधिक पारदर्शिता आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासंबंधी निवेदन दिले.
निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का?
दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव. का? मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असल्याचे प्रकार निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता? असे सवाल विराेधकांनी केले.
विधानसभा निवडणुकीआधी 18 रोजी नोव्हेंबर आम्ही खोटे मतदार नोंदणी झाल्याचे आयोगाला पत्र दिले. आम्ही बाहेरून मतदार आणल्याचे एक आमदार सांगत असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
All-party delegation meets State Election Commission, Raj Thackeray also joins Maha Vikas Aghadi
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा