Mahadev Jankar: एनडीएसोबत युती केली ही आमची चूक, महादेव जानकर यांनी व्यक्त केली खंत

Mahadev Jankar: एनडीएसोबत युती केली ही आमची चूक, महादेव जानकर यांनी व्यक्त केली खंत

Mahadev Jankar

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: एनडीएसोबत आम्ही युती केली ही आमची चूक होती, अशी खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केली.



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, भाजपसोबत युती करणे ही आमची चूक होती, कारण, त्यांनी आम्हाला धोका दिला .फुले शाहू आंबेडकर यांचे राज्य देशावर असायला हवे.ज्यांनी धोका दिला त्यांना पराभूत करणार आहे. मी अजित पवारांकडे (Ajit Pawar) युती करण्याचा प्रयत्न केला होता, पण काय झालं माहिती नाही.

या कार्यक्रमाला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते. त्यांना उद्देशून बोलताना जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, जयंती तो बहाना हें, दिल्ली में सरकार लाना हें. यावेळी राहुल गांधी, शरद पवार येणार होते परंतु आले नाहीत, यावर त्यांनी खंत देखील व्यक्त केली .

ज्या दिवशी केंद्रातील सरकार दिल्लीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करेल त्या दिवशी मी अमेरिकेत जयंती साजरी करेल. अहिल्याबाई होळकर यांची जयंती हे तर फक्त औचित्य आहे. खरे तर आम्हाला दिल्लीत सरकार आणायचे आहे. एक दिवस लाल किल्ल्यावरून आपले भाषण झाले पाहिजे हा माझा संकल्प आहे, असे ते म्हणाले.

निधन झाल्यावर माझा मृतदेह दिल्लीतच राहणार असल्याचे महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची बॉडी कराडला गेली होती. तर माजी राष्ट्रपती अब्दुल कलम यांची बॉडी त्यांच्या गावी गेली होती. पण माझी बॉडी दिल्लीतच राहणार हा माझा शब्द असल्याचे महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले.

Alliance with NDA was our mistake, Mahadev Jankar expresses regret

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023