विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या एका उर्दू पाेस्टरवरून विराेधकांकडून टाेमणे मारले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज एका पोस्टद्वारे देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख जनाब, एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मियां, मंत्री आशिष शेलार व मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा उल्लेख भाईजान म्हणून केला. भाजपच्या उमेदवाराचे एक उर्दू पोस्टर पोस्ट करत या नेत्यांना यामुळे तुमचे दिल्लीवाले पातशाह खुश झाले का? असा सवाल केला आहे.
भाजप आपल्या सहकाऱ्यांना संपवणारा पक्ष आहे असे उद्धव ठाकरे नेहमी सांगतात. सत्ताधारी महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला जात असल्याचा दावाह अंबादास दानवे यांनी केला आहे. ते म्हणाले, महायुतीत सध्या एकनाथ शिंदे यांचा मान सन्मान राखला जात नसल्याचे चित्र आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना सर्वकाही ठावूक असते. भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवतो हे उद्धव ठाकरे नेहमीच सांगत असतात. एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोडाफोडी केली. त्यांनी अनेकांना आमिषे दाखवून संघटना तयार केली. आता ते भाजपच्या फोडाफोडाविषयी अमित शहांकडे तक्रार करत आहेत. पण भाजपचे फोडाफोडीचे राजकारण योग्य नाही.
भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले. पण आज त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा भाजपला चालत आहेत. हा भाजपचा ढोंगीपणा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना उमेदवारी दिली. कारण, त्यांना उमेदवारही मिळत नाही. त्यांचे उमेदवार केवळ निधीसाठी उभे आहेत. जनता त्याला उत्तर देईल. शिवसेना अशा गुन्हेगारांना उमेदवारी देत नाही, असेही दानवे यांनी सांगितले.
शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना दानवे म्हणाले, संदिपान भुमरे यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण मी बाहेर काढणार आहे. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हे पुरावे आम्ही निवडणूक संपल्यानंतर देऊ, असे ते म्हणाले. पार्थ पवार भूखंड घोटाळ्यात महाराष्ट्राची फसवणूक केली जात आहे. हे प्रकरणही आम्ही सध्याची निवडणूक घाई संपल्यानंतर हाती घेणार आहोत.
Ambadas Danve’s attack on BJP, calling him fadnavis and Mia Shinde
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















