विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ambulance service राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणखी सक्षम करण्यासाठी रुग्णवाहिका सेवेत (Ambulance service) आता हेलिकॉप्टर, समुद्र बोटी यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू केली जाणार असून, ही सुविधा महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस -१०८) अंतर्गत उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई रुग्णवाहिका सेवा (Ambulance service) सुरू केली जाणार असून, ही सुविधा महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस -१०८) अंतर्गत उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले. यासोबतच राज्यभर नव्या स्वरूपातील २०० अत्याधुनिक भूमीवरील रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये मोबाइल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस आणि कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही ट्रायएज सिस्टीमसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
http://youtube.com/post/UgkxtqpwRUJI3XunFhIa3YfysudR2YM_Etrg?si=G_mkjOrw7e0Ysh61
ग्राहक संबंध व्यवस्थापन, संगणकीकृत डिस्पॅच प्रणाली, वाहन ट्रॅकिंग आणि रुग्ण आगमनाची पूर्वमाहिती देणारी प्रणालीही बसवली जाईल. ही रुग्णवाहिका 5G तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यामध्ये व्हेंटिलेटरसह २५ हून अधिक वैद्यकीय उपकरणे असतील. नव्या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे अधिक सुलभ होईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.Ambulance service
आरोग्य विभागाला रुग्णवाहिका सेवेसंदर्भात येणाऱ्या तक्रारीचा विचार करून ही सेवा अधिक कार्यक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमित एसएसजी बीव्हीजी या संस्थेसोबत १० वर्षांचा करार करण्यात आला असून, पहिल्या टप्यात २०० रुग्णवाहिका रस्त्यावर धावणार असल्याचे सांगितले.
Ambulance service will now include helicopters, sea boats, and emergency medical services.
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ