विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amit Satam शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बंधु एकत्र येण्याची चर्चा आहे. मात्र, यापूर्वी दाेघांनी एकमेंकांविराेधात केलेल्या जहरी टीकेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर उपलब्ध असल्याने दाेन्ही गटांची चांगलीच पंचायत झाली आहे. राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंच्या मुस्लिम अनुनयाच्या धाेरणावरून जाेरदार टीका केली हाेती. यावरून आता भाजपने हा व्हिडीओ शेअर करत उध्दव ठाकरेंना सवाल केले आहेत.Amit Satam
एक घोषवाक्य चालायचं की, बाण हवा की खान आणि दुर्दैव असं की आज उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरलेत फक्त खान, अशी टीका असलेला राज ठाकरेंचा व्हिडीओ दाखवत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे या दाेघांनाही डिवचले आहे. उत्तर दिले आहे. ‘बघा रे व्हिडीओ’, असे म्हणत अमित साटम यांनी राज ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “बघा रे व्हिडीओ. मुंबईकरांनो सावधान, उबाठाची सत्ता आली तर ‘खान’ महापौर होईल”, असा मजकूर असलेला हा व्हिडीओ आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ असून त्यात ते म्हणत आहेत, “एक घोषवाक्य चालायचं की, बाण हवा की खान आणि दुर्दैव असं की आज उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरलेत फक्त खान. ” Amit Satam
http://youtube.com/post/UgkxBNJpolV187Jqj4lX6r3hSF37O-f7zIVe?si=1UKMnFayneCL24lJ
वर्सोवा किंवा मालवणीमध्ये दिसलेल्या पॅटर्नमुळे शहर उद्ध्वस्त होऊ शकते. जर शिवसेना उबाठा सत्तेत आली, तर एक खान या मुंबईचा महापौर होईल. पण आता ते होऊ देणार नाही”, असे अमित साटम म्हणाले होते. Amit Satam
Amit Satam taunts Uddhav Thackeray, shares Raj Thackeray’s video saying “The arrow is gone, only Khan remains”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा