विशेष प्रतिनिधी
आणंद : सहकार विद्यापीठामुळे सहकारी संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात येऊन पारदर्शकता स्थापित होईल. सहकारी विद्यापीठातून प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार मिळू लागतील, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केला. गुजरातमधील आणंद इथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन केले. यावेळी ते बोलत होते.
अमित शाह (Amit Shah) म्हणाले, चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोट्यवधी गरीब आणि गावकऱ्यांच्या जगण्यात आशा निर्माण करण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेपासून, गेल्या चार वर्षांत, सहकार मंत्रालयाने भारतातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी, या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एकसमान विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 60 नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. सहकार क्षेत्राचा विकास व्हावा, सहकारातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि सहकार चळवळीत महिला शक्ती आणि युवा वर्गाचा सहभाग वाढवा यादृष्टीने सहकार चळवळ चिरकाल टिकून राहावी, हे क्षेत्र पारदर्शकता आणि लोकशाहीपूर्ण बनावे या हेतूनेच हे सर्व उपक्रम राबवले जात आहे.
त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची पायाभरणी म्हणजे सहकार क्षेत्राला बळकटी देतांना या क्षेत्रातील सर्व उणिवांची कसर भरून काढण्याच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातली सहकार चळवळ वेगाने प्रगती करत आहे, असे त्यांनी सांगितले. या विद्यापीठाची पायाभरणी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली टाकले गेलेले एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे असे ते म्हणाले. आज देशभरात 40 लाख कामगार सहकार चळवळीशी जोडले गेले आहेत, 80 लाख जण मंडळांचे सदस्य आहेत आणि 30 कोटी लोक, म्हणजेच देशातील प्रत्येक चौथी व्यक्ती ही सहकार चळवळीशी जोडली गेलेली आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
यापूर्वी देशात सहकार क्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने, सहकारी संस्थांमधील कर्मचारी आणि सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नव्हती, असे सांगून अमित शाह म्हणाले, पूर्वी कर्मचाऱ्यांना ते सहकारी संस्थांमध्ये भरती झाल्यानंतर प्रशिक्षण दिले जात होते, मात्र आता या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर, ज्यांनी प्रशिक्षण घेतले आहे त्यांनाच नोकरी मिळेल, असे ते म्हणाले. यामुळे सहकारी संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात येईल, पारदर्शकता स्थापित होईल आणि त्रिभुवन सहकारी विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांना नोकऱ्याही मिळतील.
शाह म्हणाले की, “सीबीएसईने इयत्ता 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात सहकार हा विषय समाविष्ट केला आहे. गुजरात सरकारनेही आपल्या अभ्यासक्रमात सहकार विषय समाविष्ट करावा, जेणेकरून सामान्य लोकांनाही सहकाराबाबत माहिती मिळू शकेल. हे विद्यापीठ संपूर्ण देशभरातील सहकारी संस्थांच्या प्रशिक्षणासाठी एकसंध अभ्यासक्रम तयार करून धोरणे, नवोन्मेष, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना पुढे नेण्याचे काम करेल.
आपल्या सहकारी चळवळीला संकुचित करण्यास कारणीभूतठरलेल्या कारणांचा शोध घेऊन या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर सहकारी चळवळ बहरेल, वाढेल आणि भारत संपूर्ण जगात सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल. “त्रिभुवन” सहकारी विद्यापीठात तयार होणारी धोरणे आणि अभ्यासक्रम सहकाराच्या आर्थिक मॉडेलला एका जनआंदोलनात रूपांतरित करण्याचे कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्हाला सहकारी टॅक्सी सेवा सुरू करायची आहे, सहकारी विमा कंपनीही निर्माण करायची आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विशेष ज्ञान असलेले अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी नेते आवश्यक आहेत. त्यांनी संपूर्ण देशातील सहकार क्षेत्राला आवाहन करत अमित शाह यांनी सांगितले की, “देशभरातील सहकारी प्रशिक्षण तज्ज्ञांनी या विद्यापीठात सहभागी व्हावे आणि आपले योगदान द्यावे.”
Amit Shah believes that Cooperative Universitiy will end nepotism in cooperatives and bring transparency
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी