Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर एक बनेल, अमित शहा यांचा विश्वास

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर एक बनेल, अमित शहा यांचा विश्वास

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नांदेड : Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस एकमेव असे मुख्यमंत्री आहेत जे पाच वर्ष काम करून पुन्हा निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर एक बनेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. देवेंद्रभाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. या पाच वर्षांत मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचेल असेही ते म्हणाले.Devendra Fadnavis

नांदेड येथे विशाल जनसभेत अमित शहा बोलत होते. ते म्हणाले, मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा कार्यक्रम सुरू केला आहे. येथील दुष्काळी भागांना पाणीपुरवठा करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. 2019 मध्ये 40 हजार कोटींच्या निधीतून मराठवाडा वॉटर ग्रिड प्रोजेक्ट चालू केला. 11 प्रमुख धरणांना पाईपलाईनने जोडून मराठवाड्याच्या प्रत्येक गावात पाणी पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. मधल्या काळात धोका देत आघाडी सरकार सत्तेवर आली आणि त्यांनी संपूर्ण काम थांबवले. आता देवेंद्र भाऊ पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. या 5 वर्षात मराठवाड्याच्या प्रत्येक गावात पाणी पोहोचवण्याचे काम करणार आहे. सम्राट अशोकाच्या काळापासून नेहमीच दुष्काळ सहन करणारा हा प्रदेश पाण्याने बहरून येईल.

अमित शहा म्हणाले, मोदीजींनी महान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केले आहे. एवढ्या वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. शरद पवार एवढे वर्ष केंद्रात होते परंतु त्यांनी मराठी भाषेसाठी काहीच केले नाही. मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केले आहे. येत्या दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रा पुन्हा एकदा नंबर एक बनेल. मोदींनी ठरवले आहे की 2047 मध्ये विकसित भारत बनेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी, टिळक आणि सावरकरांच्या या भूमीचे सर्वात मोठे योगदान असेल. देशात सर्वात आधी विकसित महाराष्ट्र बनेल.

आता आपल्याला असा भारत बनवायचा आहे की विकासासोबत शक्तिशाली देश असेल. जेव्हा ऑपरेशन सिंदूर तिकडे सुरू होते तेव्हा अजून एक ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट नावाने सुरू होते. छत्तीसगडमध्ये 5000 फूट उंच डोंगरावर नक्षलवादी अड्डे उध्वस्त करण्यात आले. अनेक नक्षली मारले गेले. आता मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर येऊन सांगून जातो की 31 मार्च 2026 या देशातून नक्षलवाद संपुष्टात आणला जाईल.

मी नांदेडच्या भूमीवर आलो आहे, सर्व प्रथम रेणुका देवी यांना प्रणाम करत मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो, असे म्हणत अमित शहा यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी आपले देह त्याग करण्यासाठी या भूमीची निवड केली होती, असेही ते यावेळी म्हणाले.

Amit Shah is confident that Maharashtra will once again become number one under the leadership of Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023