विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : Amol Khotkar वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी घातलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकरचा एनकाऊंटर मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. हा एनकाऊंटर सुपारी घेऊन करण्यात आला असल्याचा आरोप आरोपीच्या बहिणीने केला आहे. तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून पोलिसांच्या भूमिकेवर संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप आधीच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला होता.Amol Khotkar
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकर याचा पोलिसांच्या एनकाऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे. वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये रात्री ही चकमक झाली. यामुळे आता या प्रकरणातील सस्पेन्स आणखीनच वाढले आहे. पोलिस दरोडेखोरांच्या मागावर होते. यातील मुख्य आरोपी अमोल खोतकरला पकडण्यासाठी गेल्यावर त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पोलिसांनाच मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमोलचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून देखील अधिक माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात न्यायाधीश आहेत, न्याय आहे, सरकार आहे, सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून आरोपीला पकडा आणि तुरुंगात टाका किंवा न्यायालयासमोर हजर करा. मात्र, मारून टाकण्याचे काम पोलिसांचे नाही. मात्र हा सुपर देऊन केलेला खून आहे, असा आरोप आरोपी खोतकर याची बहीण रोहिणी खोतकर यांनी केला आहे. असे माझे स्पष्ट मत असून मला न्याय द्या, अशी मागणी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.
आम्हाला या प्रकरणी सीबीआय मध्ये केस दाखल करायची आहे. या प्रकरणात नेमके कोण होते? कोणती चोरी झाली होती? कोणी मारले? या सर्वांचा तपास सीबीआय करेल. आम्ही न्याय मागणार आहोत. बाकी आम्हाला काही नको. आम्हाला केवळ न्याय हवा आहे. आमच्या मुलाला किती गोळ्या लागल्या, हे इन कॅमेरा पोस्टमार्टेम झाल्यानंतर आम्हाला माहिती होईल. इतक्या गोळ्या छातीवर कशा लागल्या? असा आरोप मृत आरोपीचे वडील बाबुराव खोतकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं