विशेष प्रतिनिधी
बीड : महिला डॉक्टरच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे. मग यात खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए असो. त्यांनाही या प्रकरणात आरोपी ठरवलं पाहिजे. डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिच्या कुटुंबीयांच्या बाजूने उभे राहू, अशी मागणी बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तळहातावर सुसाईड नोट लिहून पोलीस अधिकाऱ्यावर शारीरिक छळाचा आरोप केला. ‘पीएसआय गोपाळ बदाणे यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी माझा मानसिक छळ केला’, असा मजकूर डॉक्टरच्या तळहातावर लिहिलेला आढळला.
यावर संताप व्यक्त करताना आमदार सुरेश धस म्हणाले, आई-वडिलांनी तीन एकर जमिनीवर लेकीला डॉक्टर बनवलं होतं. तिच्या तक्रारीची दखल न घेणारे जो कोणी अधिकारी असतील, त्या सर्वांना आरोप केलं पाहिजे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे. मग यात खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए असो. त्यांनाही या प्रकरणात आरोपी ठरवलं पाहिजे. डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिच्या कुटुंबीयांच्या बाजूने उभे राहू.
हा खटला फास्टट्रॅक कोर्टात लढवला पाहिजे. एसआयटीकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत धस म्हणाले, पोटाला चिमटा घेऊन, ऊस तोडून आमची लोकं लेकीबाळीला शिकवतात. पण कोणी गैरफायदा घेत असेल तर जरब बसलीच पाहिजे. भविष्यात अशी दुसरी घटना घडता कामा नये. जर तिला कोणी बीडची म्हणून हिणवत असेल तर ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आमची बीडची लोकं बुद्धिमान आणि सर्व क्षेत्रात पुढे जाणारे आहेत.
Angry MLA Suresh Dhas Over Doctor’s Suicide Case
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















