विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो. त्यानंतर भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. Anna Hazare
लाेकपाल विधेयक मंजूर हाेण्यासाठी अण्ण हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर लढा उभारण्यात आला हाेता. त्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतात लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. पण आता लोकपाल अध्यक्ष व त्यांच्या सात सदस्यांना आलिशान व महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत. लोकपालसाठी ऐतिहासिक लढा देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही एक क्रांतिकारी लढा लढला. आम्ही खूप झगडलो. संघर्ष केला. त्यातून लोकपाल पुढे आला. आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो. पण त्यानंतर भ्रष्टाचारावर कारवाई होत असेल तर ती फार दुर्दैवी गोष्ट आहे.
अण्णांच्या माजी सहकारी तथा जनलोकपाल चळवळीच्या समर्थक किरण बेदी यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. पण त्यांनी महागड्या गाड्या खरेदीवर नव्हे तर परदेशी गाड्या खरेदी करण्यावर आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या, लोकपालची निर्मिती वायफळ खर्चासाठी करण्यात आली नाही. त्यामुळे असले निर्णय टाळायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः स्वदेशीवर भर देतात. त्यानंतरही लोकपालसाठी परदेशी गाड्या का खरेदी केल्या जात आहेत? आपल्याकडे चांगल्या भारतीय गाड्या नाहीत का? हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी मोहिमेच्या विरोधात आहे.
गेल्या 16 ऑक्टोबर रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यात लोकपालने बीएमडब्ल्यूच्या 7 कार पुरवठा करण्यासाठी खुली निविदा मागवली होती. यासंबंधीच्या वृत्तानुसार, बीएमडब्ल्यूला लोकपाल चालक व कर्मचाऱ्यांना 7 दिवसांचे प्रशिक्षण देण्यास सांगितले जाईल. लोकपालचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्याकडे आहे. सदस्यांमध्ये निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती एल. नारायण स्वामी, न्यायमूर्ती संजय यादव व न्यायमूर्ती रितू रत्न अवस्थी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि निवृत्त जज पंकज कुमार व अजय तिर्की यांचा समावेश आहे.
लोकपालची निर्मिती ही भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी करण्यात आली. पण आता लोकपाललाच महागड्या परदेशी कारची भुरळ पडल्यामुळे त्यावर टीका होत आहे. काँग्रेस नेते खासदार पी. चिदंबरम यांनीही या कारखरेदीवरून जोरदार टीका केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना सीधा सेडान कार दिली जाते. मग लोकपाल आयुक्त व 6 सदस्यांना आलिशान बीएमडब्ल्यू कारची गरज काय? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. या कार खरेदी करण्यासाठी लोकांच्या करातून मिळालेला पैसा का खर्च केला जात आहे? या प्रकरणी किमान एक-दोन लोकपाल सदस्य तरी या कार खरेदी करण्यास विरोध करतील असे मला वाटले होते, असे ते म्हणाले होते.
Anna Hazare expresses displeasure over purchase of BMW by Lokpal Chairman and seven members
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















