Eknath Shinde : विरोधकांना कामातून उत्तर द्या, एकनाथ शिंदे यांची मंत्री आणि आमदारांना तंबी

Eknath Shinde : विरोधकांना कामातून उत्तर द्या, एकनाथ शिंदे यांची मंत्री आणि आमदारांना तंबी

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माध्यम किंवा जनसामान्यात केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे स्वत: मंत्र्याचे आणि पक्षाचे नाव खराब होते. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही, त्यांना कामातून उत्तर द्या, अशी तंबी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्री आणि आमदारांना दिली आहे.



आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेदेखील आपली तयारी सुरु केली असून पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत. शिंदे यांनी माध्यमांमध्ये बोलणे कमी आणि काम जास्त करण्याचा सल्ला आपल्या मंत्र्यांना दिला आहे. “अशी तंबीच एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिली आहे. मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यातून निवडणुकांमध्ये अपेक्षित निकाल दिसला पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना अडीच वर्षाच्या कालावधीची आठवण करून देत मंत्रिमंडळात कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेतच दिले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलग आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर गेल्यानंतर चांगलीच चर्चा रंगली. एकनाथ शिंदेंनी आपल्या दौऱ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 25 मिनिटे एकांतात चर्चा झाली. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांसोबत घेऊनही एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा कस लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, दिल्लीत वारंवार येण्यामागे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कथित मतभेद असल्याचा इन्कार शिंदे यांनी केला आहे. ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतिपदाच्या भाजपप्रणीत ‘एनडीए’ला शिवसेना बिनशर्त पाठिंबा देईल, असे त्यांनी सांगितले.

Answer the opposition through work, Eknath Shinde warns ministers and MLAs

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023