विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत २९ तारखेला आंदाेलन करण्याचा इशारा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी दिला हाेता. मात्र, आझाद मैदानात पुढील दोन आठवडे आंदोलन करता येणार नाही असा निर्णय उच्च न्यायालायने दिला आहे. यावरून वकील ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर जाेरदार हल्लाबाेल केला आहे. जरांगे माजला आहे, त्याची भाषा मग्रुरीची आहे, त्याला अटक झाल्यानंतरच कायदा कळेल. मनोज जरांगे, तू आता आंदोलन करु शकत नाहीस असे आव्हानही सदावर्तेंनी दिलं. Gunratna Sadavarte
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईंमध्ये आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. पण त्यापूर्वीच मनोज जरांगेंना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यावर बाेलताना सदावर्ते म्हणाले की, “मुंबईला जो कुणी अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल त्याला कायदा त्याची जागा दाखवेल. मनोज जरांगेंना आंदोलनासाठी न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. जरांगे यांच्याकडून महिलांबाबत चुकीच्या शब्दात टीका केली जाते. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर आम्ही रितसर पोलिसांकडे तक्रार दिली होती. न्यायालयातही अर्ज केला होता. मनोज जरांगे न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. मनोज जरांगे यांच्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत.”
जरांगेंचे आंदोलन दिसत असलं तरी त्याचा आत्मा राजकीय आहे. जरांगे कुणाच्या तरी हातातील बाहुले आहे. यापुढे त्याचे कोणतेहा बेकायदा कृत्य चालणार नाही असा इशारा सदावर्तेंनी दिला. किती माजलाय तो जरांग्या, त्याची भाषा मग्रुरीची आहे. जरांगेला अटक होणे आणि त्याला कायदा कळणे यानंतरच त्याला समजेल, अशी टीका सदावर्ते यांनी केली.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला. जरांगेंच्या मोर्चाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेवर सनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले.
Arrogant Tone of Jarange Exposed: Gunratna Sadavarte Launches Attack
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला