विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी नव्हे तर महाकन्फ्यूज आघाडी आहे. डोळ्यापुढे पराभव दिसत असल्यामुळे तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. रडीचा डाव खेळणे सुरू असल्याचा टाेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे. Eknath Shinde
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तिन्ही घटकपक्षांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. यावर पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आपल्या तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आले आहे. ही महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी आहे. त्यांच्यात एवढे कन्फ्यूजन आहे की, कोण काय बोलते हे काहीच समजत नाही. कुणाचा कुणाशी पायपोस नाही. त्यामुळे हे कन्फ्यूज लोक एकत्र आलेत.
आज राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीने काम करत आहे ते पाहून तथा सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक पॅकेज पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांनी महायुतीचा लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील विजय पाहिला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे समोर पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पराभव समोर दिसू लागतो तेव्हा अशा प्रकारच्या तक्रारी माणसे सुरू करतात. त्यामुळे त्यांनी तशा तक्रारी सुरू केल्या आहेत.
शिंदे म्हणाले, मी एवढेच सांगेन की, जेव्हा महाविकास आघाडीला विजय मिळाला, तेव्हा तेव्हा त्यांनी तक्रारींचा पाढा केव्हाच वाचला नाही. पण पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी हा पाढा वाचला. अगदी त्यांनी निवडणूक आयोग व न्यायालयासह सर्वांवरच आरोप केले. आत्ताही याठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे ते रडीचा डाव खेळण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आले आहेत. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनता काम करणाऱ्या, विकास करणाऱ्या व लोकाभिमूख योजना राबवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या पाठिशी उभ्या राहणाऱ्या महायुती सरकारच्या मागे उभे राहील. विरोधक कितीही एकत्र आले तरी महायुती आगामी निवडणुकांत प्रचंड यश मिळवेल व विजय मिळवेल.
As defeat looms, opposition’s red-handed strategy, Eknath Shinde’s resignation
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा