विशेष प्रतिनिधी
ठाणे : मनोज जरांगे परत का आले, हे एकनाथ शिंदेंनाच विचारा. मागच्या वेळी जेव्हा ते नवी मुंबईत गेले होते, तेव्हा प्रश्न त्यांनीच सोडवल्याचे सांगितले होतं. मग आता पुन्हा आंदोलन का उभं राहिलं?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. ठाण्यातील दौऱ्यात पत्रकारांनी मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतील. जरांगे परत का आले याचं उत्तर तेच देऊ शकतील.मागच्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवलेला ना, मग हे परत का आले?
दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्य सरकारवर वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर सुमारे एक तासभर चर्चा झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली. महायुती सरकारमध्ये तीन वेगळे गट आहेत. शिंदे गट आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहे, कारण त्यांचा उद्देश फडणवीसांना अडचणीत आणणं हाच आहे, असा थेट आरोप राऊतांनी केला.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले होते. जरांगे म्हणाले होते की, एकनाथ शिंदे साहेब हा माणूस खरा आहे. साथ देतो. जनतेची वेदना समजून घेतो. गोर-गरिबांच्या वेदना जाणून घेतो. सत्तेपेक्षा गोरगरिब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे तर गरिबांचे प्रश्न जाणून घेऊन ताबडतोब सोडवायचे, जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं हे काम तडकाफडकी अजित पवार करतात, असे त्यांनी म्हटले होते.
Ask Shinde why Jarange returned, Raj Thackeray taunts Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा