विशेष प्रतिनिधी
मुंबई : संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये “इंदुरी चाट आणि बरंच काही…” हे उपहारगृह सुरु केल्यावर त्यांच्या मराठी प्रेमावर भाजपने हल्ला चढविला. परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या देशपांडे यांच्यावर निशाणा साधत मनसेला अडचणीत आणले जात आहे. Sandeep Deshpande
मराठी भाषा, स्थानिक रोजगार आणि भूमिपुत्रांना न्याय या मुद्द्यांवर सतत महायुती सरकारवर हल्लाबोल करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यावर सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांकडून टीका केली जात आहे.
संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये सुरु केलेल्या या उपहारगृहात मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील पारंपरिक खाद्यपदार्थ दिले जातात. याचा व्हिडिओ खुद्द देशपांडेंनी त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी उल्लेख केला होता की, सुप्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी त्यांच्या उपहारगृहाला भेट दिली होती.
याच पार्श्वभूमीवर, भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक पेजवरून देशपांडेंवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या हॉटेलचा कूक परप्रांतीय, या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय. नाव देवनागरीत लिहिलं म्हणून मराठीपण? यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी ठेवता येत नाही, आणि हे मराठी महापौराच्या गप्पा मारत आहेत. महापौर मराठीच होणार, पण महायुतीचा आणि हिंदुत्ववादी विचारांचा!” इतकंच नव्हे तर, राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा फोटो लावत, “हमारे संदीप भय्या के दुकान में आनेका हा” अशा प्रकारच्या पोस्टसह भाजप समर्थकांनी मनसेवर उपरोधिक हल्ला चढवला आहे.
टीकेला उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले की, “इंदुरी चाट”वरून मला ट्रोल करणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. मराठे इंदूर भागात गेले, तिथे त्यांनी स्थानिक पदार्थांवर आपला प्रभाव टाकला. तेच पदार्थ पुढे ‘इंदुरी फूड’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना इतिहास माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची ही दिवाळखोरी आहे”, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
Attack on Sandeep Deshpande’s hotel, Induri chaat and much more… MNS in trouble
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!