विशेष प्रतिनिधी
जालना : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्वी टीका करणाऱ्या मराठा आंदोलक मनाेज जरांगे यांनी आता मात्र त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. बीडमधील ओबीसी माेर्चा हा देवेंद्र फडणवीस यांची इमेज डॅमेज करण्यासाठी काढण्यात आल्याचा आराेप जरांगे यांनी केला आहे. Devendra Fadnavis
बीडमधील माेर्चाच्या पार्श्वभूमीवर जरांगे म्हणाले, बीडमधील मोर्चा हा ओबीसींचा मोर्चा नसून, ठराविक जातींचा मोर्चा आहे. फडणवीसांच्या लक्षात आले पाहिजे की, हा मोठा गेम असू शकतो. फडणवीसांची इमेज डॅमेज करायचा प्रयत्न आहे. सरकारमध्ये यांचेच लोक, मोर्चे काढणारे अजित पवारांचे लोक आहेत, हे यांना कळत नाही का? मात्र, फडणवीसांवर शंका येते की, मुंबईतल्या आंदोलनाच्या गाड्यांना आता नोटीस आल्या आहेत. मात्र, गोड बोलून वार करू नये. पण सध्या तर फडणवीसांबद्दल असे वाटत नाही. Devendra Fadnavis
जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना जितके अडचणीत आणता येईल, तितके प्रयत्न या लोकांचे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कसा फटका बसेल, याचे काम ते करत आहेत आणि त्यासाठी बीडचा मोर्चा आहे. आम्हाला वाटते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाची मने जिंकली आहेत. सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला शंका नाही. आम्हाला पक्के माहिती आहे की, त्यांनी गोरगरीब मराठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे ठरवले आहे. देवेंद्र फडणीस यांना गोरगरीब मराठ्यांचा आयुष्य उध्वस्त करण्याची इच्छा नसावी, असे आम्हाला वाटते आणि म्हणून त्यांनी जीआर काढला आहे आणि तोही हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन काढला आहे.
राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चा दिसत असल्याचा आरोप करताना जरांगे म्हणाले, बीड मध्ये निघणार मोर्चा ओबीसींचा नाही. काही विशिष्ट जातीचे लोक उपस्थित राहणार आहेत. कारण ओबीसींच्या लक्षात आले आहे की, हा मोर्चा आपल्या फायद्याचा नाही. हा राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चा दिसत आहे. कारण त्या मोर्चात सर्व अजित दादांचे लोक त्यामध्ये दिसतात. सरकारने जीआर काढला, सरकारमधील लोक त्या विरोधात जातात आणि याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यायला पाहिजे.
हैदराबाद गॅजेट सांगत असेल की, मराठा हा कुणबी आहे, तर ते गेले कुठे ते तरी आम्हाला दाखवावे. आम्हाला कळेल आणि मराठ्यांच्या लक्षात येईल की, कोणता नेता व्यासपीठावर गेला आहे, कोणत्या गावाचे कोण गेलेत. ओबीसींना आरक्षण मिळू नाही, म्हणून मराठा समाज मोर्चात गेला नव्हता. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून हा बीडच्या मोर्चामध्ये सहभागी झाला, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
Attempt to damage Devendra Fadnavis’ image, Manoj Jarange expressed faith in the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा