विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने अपमानाजनक वागणूक दिली. काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी स्वतःची अवहेलना करुन घेतली आहे. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यास दुःख होत असेल. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना क्षमा करावी, यासाठी शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट देऊन वंदन केले.
इंडिया आघाडीची गुरुवारी दिल्लीत बैठक झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत, एक प्रेझेंटेशन देण्यात आले होते. यावेळी शिवसेना (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे सहाव्या रांगेत बसले असल्याचे फोटो समोर आले. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपमानजनक वागणूक देण्यात आली.
शिवसेना (शिंदे) नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उपरोधिक आंदोलन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी बाळासाहेबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन त्यांना वंदन केले. यावेळी पक्षाच्या विधान परिषदेतील आमदार मनिषा कायंदे, शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.
उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने अपमानाजनक वागणूक दिली असा आरोप मनिषा कायंदे यांनी केला. त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे हेडकॉर्टर दिल्ली झाले आहे. त्यांचे नेते आणि आका आता सोनिया गांधी राहुल गांधी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांना युतीमध्ये मानसन्मान होता. त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यांचे स्थान हे मध्यवर्ती होते. बैठकीतील आसन रचनेत त्यांची खुर्ची ही मध्यस्थानी असायची. आज तिथे दिल्लीत त्यांना पाचव्या सहाव्या रांगेत बसवले, असा आरोप त्यांनी केला.
शिवसेना (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रेझेंटेशनचे फोटो ट्विट करत “बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे?” असा सवाल केला. यानंतर मुंबईतील एकनाथ शिंदेंच्या काही शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होत यांना माफ करा अशी विनंती बाळासाहेबांना केली. उपरोधिक आंदोलन शिंदेंच्या शिवसैनिकांकडून यावेळी करण्यात आले. त्यांना वाकायला सांगितले, ते सरपटायला लागले…
बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो आहे. तुमचा पक्ष हा आता चांगल्या हातात आहे. कालचे चित्र पाहून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला त्रास झाला असले, म्हणून आम्ही येथे बाळासाहेबांना वंदन करायला आलो आहे. आम्हाला शिवसैनिक म्हणूनही कालचे चित्र पाहून वाईट वाटले, असे मनिषा कायंदे यांनी म्हटले.
शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, हिंदूत्व सोडल्यावर काय आवस्था झाली आहे. त्यांना वाकायला सांगितले होते मात्र ते सरपटायला लागले. संजय राऊत हे राहुल गांधींच्या घरी भांडी घासत होते, अशी माहिती आमचे खासदार नरेश म्हस्के यांना मिळाली आहे. हिंदूत्व सोडल्यावर यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भांडीच घासावी लागणार आहेत. राहुल गांधींवर देखील म्हात्रेंनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, ते माणूस आहेत आहेत, बुद्धी नाही अशी त्यांची आवस्थ आहे.
Balasaheb, forgive Uddhav Thackeray, rebuke from Shinde group
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल