विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोटनिवडणुकीबाबत महायुतीचा आत्मविश्वास व्यक्त करत सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा दावा केला. “ही निवडणूक एकतर्फी असून सुनेत्रा वहिनी विक्रमी मतांनी विजयी होतील,” असा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. Baramati Bypoll
बारामती येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी पाटील म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार असून भाजप हा प्रमुख घटक पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. “दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बारामतीत आले होते, आज मी दौऱ्यावर आहे. निवडणूक एकतर्फी असली तरी कार्यकर्त्यांनी ढिलाई करू नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप हा एकमेव पक्ष आहे जो निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुढील निवडणुकीच्या तयारीला लागतो. “काही वेळा विजयाची शक्यता कमी असतानाही आम्ही पूर्ण ताकदीने लढतो. डिपॉझिट जरी जप्त झाले तरी त्यातूनच पक्षाची वाढ होत गेली आणि आज देशातील २१ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहेत,” असे त्यांनी सांगितले.
२०२९ मध्ये कोण लढणार याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, महायुती म्हणूनच सर्व निवडणुका लढवल्या जातील. “ज्या पक्षाला जागा मिळेल, तो उमेदवार उभा करेल आणि इतर घटक पक्ष पूर्ण ताकदीने त्याला पाठिंबा देतील. पक्षाची दिशा कार्यकर्त्यांवर नव्हे तर नेतृत्वावर ठरते,” असे त्यांनी नमूद केले.
आदिती तटकरे यांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, या विधानावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, “स्वतःच्या नेत्याला मोठं होताना पाहण्याचं स्वप्न प्रत्येक कार्यकर्त्याने पाहायला हवं. स्वप्न पाहिल्यानेच पक्षाची वाढ होते. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, उद्या काय होईल हे राजकारणात सांगता येत नाही.”
“आपल्या संस्कृतीनुसार राजकीय मतभेद असले तरी कुटुंबातील कार्यक्रमांमध्ये सर्वजण एकत्र येतात. सुनेत्रा वहिनी उमेदवार असल्याने रोहित पवार प्रचार करतील, पुढे काय होईल ते पाहावे लागेल.”
Baramati Bypoll One-Sided; Sunetra Pawar Set for Record Victory, Says Chandrakant Patil
महत्वाच्या बातम्या
- CM : महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन, मुख्यमंत्र्यांची भावना
- Amol Mitkari : अमोल मिटकरींनी यांची ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक
- “महात्मा फुले यांच्या विचारांची आज सर्वाधिक गरज” – अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी फुलेवाड्यात व्यक्त केली खंत!
- भुजबळांचे हेलिकॉप्टर थेट कार पार्किंगमध्ये! मोठा अनर्थ टळला..