विशेष प्रतिनिधी
मुंबई : Best buses बेस्ट उपक्रमाची बससेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी मुंबईकर प्रवाशांसाठी सोयीस्कर व सुयोग्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आपल्या बसगाडीच्या संचालनाची प्रत्यक्ष (live) माहिती गुगल मॅपवर देण्यास सुरुवात केली आहेBest buses
गुगल आणि बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक उपक्रम (बेस्ट) यांनी गुगल मॅप्सवर बेस्ट सेवांसाठी प्रत्यक्ष बस माहिती प्रारंभ करण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रणालीचा उदघाटनसमारंभ महाराष्ट्राचे ‘गुगल मॅप वर बसमार्गाची माहिती’ या प्रणालीचा उदघाटन समारंभ पार पडला. या सहयोगाचा उद्देश प्रवाशांना बस येण्याच्या वेळा, मार्ग आणि संभाव्य विलंब याबद्दलचे थेट अद्ययावत माहिती गुगल मॅप अॅप्लिकेशनमध्ये प्रदान करणे आहे.
यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना, केवळ कोणती बस पकडायची हेच नाही तर त्यांच्या थांब्यावर येणाऱ्या बसची प्रत्यक्ष आगमन वेळ देखील दिसेल. यामुळे अंदाजे प्रवास कालावधी तसेच आणि विलंबाची सूचनाही प्रवाश्यांना मिळणार आहे. प्रत्यक्ष (live) माहितीवर आधारित आगमन वेळा गुगल मॅप्सवर हिरव्या किंवा लाल रंगात चिन्हांकित केल्या आहेत. बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीच्या आधारे गुगल मॅप्स ही माहिती प्रत्यक्षात अद्ययावत करेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, बेस्ट आणि गुगल मॅपमधील हे सहकार्य मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवेला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सेवेचा बेस्ट उपक्रमाला देखील फायदा होईल. बस प्रवाशांना बस मिळण्याबाबतची जी अनिश्चितता होती ती यामुळे दूर होईल. परिणामी प्रवास सोपा होण्यास मदत होईल.
Best buses on Google Maps, real-time location will be known
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत