विशेष प्रतिनिधी
सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या नातसून तसेच काँग्रेस महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा आणि प्रभावी नेत्या जयश्री पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सांगलीच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या विजयाच्या गणितात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. Sangli District
जयश्री पाटील या दिवंगत मंत्री मदन पाटील यांची पत्नी आहेत. मदन पाटील हे काँग्रेसचे प्रभावी नेते होते. वसंतदादा पाटील ल घराण्याचा महाराष्ट्रात मोठा राजकीय दबदबा होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदावर त्यांनी यशस्वी काम केले आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना सांगलीसाठी उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि बंडखोरी केली. या बंडासाठी काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचे मन वळवता आले नाही.
जयश्री पाटील या गेली दोन दशके काँग्रेसमध्ये सक्रीय होत्या. महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात बळकट संपर्क साधला होता. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस पक्षासाठी त्या प्रभावशाली वक्त्या, संघटक आणि महिला मतदारांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जात होत्या.
गेल्या काही महिन्यांपासून जयश्री पाटील या काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज होत्या. अनेक वेळा त्यांनी पक्षश्रेष्ठींना कार्य पद्धतीतील त्रुटींविषयी सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या मतांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही. त्यामुळे देखील त्या नाराज होत्या. Sangli District
Big blow to Congress in Sangli district, Vasantdada Patil grandson joins BJP
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी