विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी जे.एम. म्हात्रे यांनी आता भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने, शेकाप आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
७ मे रोजी उलवे नोड येथे स्व. जनार्दन भगत पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हात्रे माजी मंत्री व भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो समर्थकांसह अधिकृतरित्या भाजपात प्रवेश करणार आहेत.या प्रवेशाआधी म्हात्रे यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हिरवा कंदील मिळवला असून, त्यानंतरच त्यांनी हा निर्णायक पाऊल उचलले.
शेकापसाठी हा मोठा धक्का ठरतो आहे. म्हात्रे हे नवी प्रभावशाली आणि सर्वपक्षीय मान्यता असलेले नेतृत्व मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्थानिक नगरसेवक, माजी पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांनीही भाजपात जाण्याची तयारी दर्शवली आहे.
या घडामोडीमुळे शेकापच्या गडात भाजपने आपले बळ वाढविले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ताकदीत वाढ होणार आहे.
महाविकास आघाडीच्या विरोधातील असंतोष आणि स्थानिक राजकारणात नेतृत्वाच्या अभावामुळे म्हात्रे यांनी भाजपचा पर्याय स्वीकारला आहे.
Big boost for BJP; J.M. Mhatre will enter, big political shock for Shekap
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा