विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis महाराष्ट्रातील औषधनिर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेत, देशातील आघाडीची जैवतंत्रज्ञान कंपनी बायोकॉन लिमिटेड पुण्याजवळ इन्सुलिन उत्पादन प्रकल्प उभारण्यास उत्सुक आहे. बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मजुमदार-शॉ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विशेष बैठक झाली. यावेळी फडणवीस यांनी बायोकॉनच्या प्रस्तावाचे स्वागत करत राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.CM Fadnavis
जिओ वर्ल्ड सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या WAVES 2025 या दृक-श्राव्य समिटमध्ये झालेल्या बैठकीत बायोकॉनने महाराष्ट्रात इन्सुलिन उत्पादन युनिट उभारण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “बायोकॉनसारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा दर्शवणे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. औषधनिर्मिती आणि बायोटेक क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर राहणार.”
याच बैठकीत फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बायोकॉन व्यवस्थापनाशी तातडीने चर्चा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.
बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मजुमदार-शॉ यांनी सांगितले की, “पुणे परिसरात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे भारतात जागतिक दर्जाची इन्सुलिन निर्मिती शक्य होईल. बायोकॉन लवकरच जगातील आघाडीच्या इन्सुलिन उत्पादक कंपन्यांमध्ये सामील होईल.”
या प्रकल्पामुळे हजारो नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जागतिक दर्जाची आरोग्य सेवा मिळणार आहे.मेड इन इंडिया’ औषध निर्मितीला गती प्राप्त होणार आहे.
राज्य सरकारच्या औद्योगिक, वैद्यकीय आणि फार्मास्युटिकल धोरणांमुळे महाराष्ट्र हे आज उच्च दर्जाच्या गुंतवणुकीसाठी आदर्श गंतव्यस्थान बनले आहे. बायोकॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने महाराष्ट्रावर विश्वास दाखवणे हे राज्याच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक आहे.
Biocon’s insulin project near Pune; CM Fadnavis assures cooperation
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती