विशेष प्रतिनिधी
नांदेड : Loha Municipal Council लाेहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने घराणेशाहीचा आराेप हाेत आहे. पती, पत्नी, भाऊ, भावजय, मेव्हणा आणि भाच्याची पत्नी हे सहा जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.Loha Municipal Council
नांदेडच्या लोहा नगरपरिषदेच्या (Loha Municipal Council) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबातील ६ जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याशिवाय नगरसेवकपदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी यासोबतच मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे. भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे घराणेशाही चालत नाही असं मिरवणाऱ्या नेत्यांनीच पक्षातील उमेदवारी एकाच कुटुंबातील ६ जणांना दिली आहे. त्यामुळे सध्या लोहा नगरपरिषदेतील ही घराणेशाही चांगलीच चर्चेत आली आहे.
लोहा नगरपरिषदेत एकूण १० प्रभागातील २० नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. त्यात मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, भाजपा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिवसेना शिंदे गटानेही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपाने या निवडणुकीत सर्व २० जागांवर उमेदवार उतरवले आहेत. त्यातील ६ जण एकाच कुटुंबातील आहेत. नगराध्यक्षपदी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी मिळाली आहे. पत्नी गोदावरी सूर्यवंशी यांना प्रभाग ७ अ, भाऊ सचिन सूर्यवंशी प्रभाग १ अ, भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी प्रभाग ८ अ, मेव्हुणा युवराज वाघमारे प्रभाग ७ ब, भाच्याची पत्नी रिना व्यवहारे यांना प्रभाग ३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.दरम्यान, लोहा नगरपरिषदेत भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल. याठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बालेकिल्ला मानला जातो. आतापर्यंत या नगर परिषदेवर प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपा नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत आहेत.
BJP accused of nepotism, six people from the same family nominated for Loha Municipal Council
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















