विशेष प्रतिनिधी
मुंबई: आम्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजप नेत्यांच्या बुडाला आग लागली आहे. ही आग सर्वांपुढे दाखवताही येत नाही आणि शमवताही येत नाही, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. Uddhav Thackera
विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, आम्ही एकत्र आल्यामुळे या लोकांच्या बुडाला आग लागणे स्वाभाविकच आहे. कारण, भाजपचे राजकारणच तोडा, फोडा व राज्य करा यावर अवलंबून आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या व त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हाच भाजपचा धंदा आहे. हा धंदा आता संपला आहे. त्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागल्याचे मी समजू शकतो.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
काही लकडबग्घे (तरस) आहेत. हे लोक इथे गुण्यागोविंदाने राहणाऱ्यांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी काहीही बोलावे. त्यांना इथे कुणीही ओळखत नाही. मी त्यांना तरस या प्राण्याची उपमा दिली. पण हे लोक त्याही लायकीचे नाहीत. काड्या करणे हाच त्यांचा उद्योग आहे. त्यांनी इकडे येऊन पाहावे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्यामुळे तुम्ही उगीच भाषिक वाद इकडे करू नका. आमच्याकडे सगळे आनंदाने राहतात. शिवसेना व शिवसैनिक रक्तदान, रुग्णवाहिका आदी सर्वच सेवा कोणतीही जात-पात धर्म न पाहता पुरवतात. त्यामुळे या बाहेरच्या लोकांनी स्वतःचे घर पाहावे. स्वतःचा पक्ष जो मेलेला आहे, तो जिवंत होतो का हे पहावे, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी हिंदी भाषिकांवर हल्ला करणाऱ्यांची तुलना पहलगाम हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांशी करत आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसांची तुलना अतिरेक्यांशी करणारे लोक मराठी व महाराष्ट्राचे मारेकरी आहेत. या मारेकऱ्यांना मराठी लोकांनी आता ओळखले पाहिजे. हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. त्यांनी हा विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले का? हे त्यांनी सांगावे. ते सापडत का नाहीत? जे लोक आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांच्या घरात हे अतिरेकी राहत आहेत का? गेले कुठे? त्यांना लाज वाटली पाहिजे. एकतर ती हिंदूंना वाचवू शकत नाही आणि मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेता. हे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत. याची लाज वाटते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी मेळाव्यातील भाषणाची रुदाली अशी हेटाळणी केल्याची बाबही पत्रकारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते म्हणाले, मी त्यांची मानसिकता समजू शकतो. कारण, मूळ भाजप हा पक्ष मेलेला आहे. त्याचाच खून या लोकांनी केला आहे. त्यांचे जे काही रुदाली सुरू आहे, हा रुदाली सुद्धा हिंदी शब्द आहे. त्यामुळे ते आपला उर बडवत आहेत. हा उर बडवण्यासाठी त्यांनी आमच्या पक्षातले उरबडवे घेतलेत. काँग्रेसचे उरबडवे घेतले. राष्ट्रवादीचे उरबडवे घेतलेत. त्यांनी देशभरात इतर पक्षांतील उरबडवे घेतलेत. कारण शिवसेनेसोबत युती करणारा मूळ भाजप या लोकांनी मारून टाकला. त्याचे दुःख व्यक्त करताना जे उर बडवत आहेत, ते उर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजनल माणसे नाहीत. त्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो. पण मराठी माणसांचे आनंदी क्षण ज्यांना रुदाली वाटत असतील, ते अत्यंत विकृत व हिणकस आहेत
BJP leaders are under fire because we Thackeray brothers came together, Uddhav Thackeray criticizes
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी