विशेष प्रतिनिधी
मुंबई : बोगस मतदार ही लोकशाहीची थट्टा असून, निवडणूक यंत्रणा आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. Manda Mhatre
म्हात्रे म्हणाल्या की, दरवेळी 20 ते 22 हजार बोगस आणि दुबार नावांची यादी प्रशासनाला दिली, तरीही कारवाई शून्यच राहिली. यामुळे प्रामाणिक उमेदवारांना निवडणुकीत अन्याय सहन करावा लागतो.
मी 2004, 2009 आणि 2014 या तीनही निवडणुकांमध्ये बेलापूरमधून लढले. प्रत्येक वेळी निवडणुकीपूर्वीच अधिकाऱ्यांकडे 20 ते 22 हजार बोगस आणि दुबार नावांची यादी सर्वेक्षण करून सादर केली होती, पण त्यावर कधीच कारवाई झाली नाही.” असे आरोप करत मंदा म्हात्रे म्हणाल्या की, “अनेक वेळा जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी आणि बीएलओ यांना सांगूनही तीच नावे यादीत पुन्हा दिसतात.
काही ठिकाणी अधिकारी या नावांच्या नोंदणीत सामील असतात आणि अनेकदा या व्यवहारात पैशांची देवाणघेवाणही होत असल्याचे दिसते. बोगस मतदानामुळे प्रामाणिक उमेदवारांना मोठा फटका बसत आहे. या बोगस नावांमुळे सकाळच्या सत्रात मतदान होतो आणि प्रामाणिक उमेदवारांना त्याचा फटका बसतो. अनेकदा मतदार सांगतात की, आमचे मतदान कोणीतरी आधीच करून गेले आहे, अशी परिस्थिती बदलण्याची गरज आहे.
निवडणूक यंत्रणा पारदर्शक असायला हवी. देशात पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल प्रणाली दिली आहे, त्यामुळे नावे तपासणे मोठी गोष्ट नाही. फक्त इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा हवा, असे मत व्यक्त करत त्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
BJP MLA Manda Mhatre alleges that the electoral system’s role in witnessing a mockery of bogus electoral democracy
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा