विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर: राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले ( वय 65) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.कर्डिले यांना पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांना साईदीप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. Shivajirao Kardile
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहा वेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.
शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत झपाट्याने घडलेला होता. त्यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केले.
२००९ मध्ये कर्डिले हे अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्या लढतीत त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश करून पुन्हा आमदारकीची निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुद्द राहुरीत सभा घेतली होती.
2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नंतरच्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांनी विजय मिळवून पुन्हा विधानसभेत प्रवेश केला होता.
BJP MLA Shivajirao Kardile dies of heart attack
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा