विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP महाराष्ट्रातील जनतेने इतका मोठा जनादेश दिल्यावर आता भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळाची साफसफाई करण्याचे ठरविले आहे. महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या चार मंत्र्यांचा फेरसमावेश करण्यास भाजपने नकार दिल्याची चर्चा आहे. मावळत्या मंत्रिमंडळातील संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या चार मंत्र्यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप आहे.BJP
तानाजी सावंत यांनी मंत्री पदाच्या काळात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांना भाजपचा विरोध आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठकीत बसल्यावर ओकारी येते असे सावंत म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचीही सावंत यांना टोकाच्या विरोधाची भूमिका आहे. मात्र सावंत यांचा कोणत्याही परिस्थितीत मंत्रीमंडळात समावेश झाला पाहिजे, अशी शिंदे यांची भूमिका आहे. सावंत यांना बाहेर ठेवण्यास शिंदे तयार नाहीत.
तत्कालीन महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले संजय राठोड हे एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरले होते. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली होती. त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता. मात्र महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला. यावरून चित्रा वाघ यांना पत्रकारांनी अडचणीत आणणारे प्रश्न विचारले होते. मात्र, राठोड यांना बंजारा समाजाचा असलेला पाठिंबा लक्षात घेता त्यांना दूर ठेवणे शिंदे यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपमध्येच प्रचंड नाराजी आहे. त्यांची वादग्रस्त वक्तव्य महायुती सरकारसाठी अडचणी ठरली होती. त्यांना मंत्रीपद देण्यास विरोध आहे.
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची झाल्यास केसरकर यांना कदाचित थांबावे लागेल. कारण उदय सामंत आणि केसरकर हे कोकणातील दोघे मंत्रिपदी असताना गोगावले यांचा समावेश झाल्यास ही संख्या तीन होईल.
BJP oppose Sawant, Rathod, Sattar and Kesarkar in the cabinet
महत्वाच्या बातम्या
- Imtiaz Jalil : ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
- Waqf Board अधिकाऱ्यांनी परस्पर आदेश काढून दिला वक्फ बोर्डाला 10 कोटीचा निधी , कारवाई होणार
- अजित दादांचे हे नाव घेतले पण छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले, मुख्यमंत्री होणं देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क
- Rajabhau waje ठाकरे गटाच्या खासदाराला स्वतःच्या गावातच गावबंदी