विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीबाबत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. Ravindra Chavan
रवींद्र चव्हाण म्हणाले, “राज ठाकरे हे अत्यंत समजूतदार नेते आहेत. त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्नेही संबंध आहेत. त्यामुळे दोघेही मुंबईच्या जनतेच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेतील.”
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या ‘विजयी मेळाव्या’नंतर मनसे-ठाकरे गट एकत्र येऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) यावर यावेळी प्रथमच उघडपणे सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या युतीविषयी अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाही. उलट त्यांनी कार्यकर्त्यांना युतीबाबत वक्तव्ये किंवा चर्चा न करण्याचा सल्ला दिला होता.
रवींद्र चव्हाण म्हणाले, म्हणाले, राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी स्टेटमेंट दिले होते की, कार्यकर्त्यांनी युतीच्या संदर्भात काहीही बोलू नये. चर्चा करू नये. त्यामुळे प्रत्येक पक्ष व प्रत्येक संघटना आगामी निवडणुकांच्या दिशेने अत्यंत सावधपणे पाऊले टाकत असल्याचे स्पष्ट होते. राज ठाकरे हे अतिशय समजदार आहेत. त्यांचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे हे दोघेही मुंबईच्या दृष्टिकोनातून जे जनतेचे हित आहे, त्यानुसारच पाऊले उचलतील.
त्यामुळे चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे ही युती खरोखर होणार की राज ठाकरे पुन्हा एकदा ठाकरे गटापासून लांब राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही राज्यभर काम करत आहोत, असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचे काम केले आहे. संघटन बळकट करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत,” असे ते म्हणाले.
BJP state president’s statement raises new question marks over MNS-Thackeray alliance
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार