विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या फिरोज टॉवर इमारतीत ४ आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि दुपारी ३ वाजता स्फोट होतील, असा ईमेल करून मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा हा ईमेल आला आहे. याबाबतची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून परिसरात शोध मोहीम सुरू केली. परंतु, पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
याप्रकरणी रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवरील ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. रविवारी कार्यालय बंद असल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला सोमवारी या ईमेलबाबत माहिती मिळाली.
त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला.दरम्यान, पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. याप्रकरणी बीएनएसच्या कलम ३५१(१)(ब), ३५३(२), ३५१(३), ३५१(४) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bomb threat to blow up Bombay Stock Exchange building
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला